पुणे - पुणे महापालिकेच्या मुख्यालयात सुरू असलेल्या बैठकी दरम्यान माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि आयुक्त नवल किशोर राम यांच्यात उघड वाद उफाळून आला. बैठकीदरम्यान शिंदे यांनी आयुक्तांच्या दालनात घुसखोरी करत थेट अंगावर धाव घेतल्याने क्षणभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या घटनेला आता मराठी विरुद्ध अमराठी असा राजकीय रंग चढू लागल्याने राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.