
पुण्यात घडामोड... संजय राऊतांच्या सभेआधीच मनसे नेत्याच्या हाती 'शिवबंधन'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या उत्तरसभेत देखील मशिदीवरील भोंग्यासाठी अल्टीमेटम दिला. औरंगाबादच्या सभेतही त्यांनी हा मुद्दा लावून धरला. मात्र, यामुळे मनसेचे मुस्लीम कार्यकर्ते राज ठाकरेंवर नाराज आहेत. पहिल्या सभेनंतरच ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागली होती. (Shabaz Punjabi in Shivsena)
मुंबईसह मराठवाड्यातील ३५ मनसैनिकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पुण्यातही राजीनामे पडले. सुरुवातीला मनसेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शेहबाज पंजाबी यांनी राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पंजाबी आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी संजय राऊत यांची पुण्यात सभा पार पडणार आहे. यावेळी ते शिवबंधन बांधणार असल्याचं कळतंय. (Raj Thackeray News)
हेही वाचा: राज ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा
मनसेला रामराम केलेले वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शेहबाज पंजाबी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. पंजाबी यांच्यासह मनसेतून बाहेर पडलेले 10 ते 12 जण त्यांच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत. पंजाबी यांनी मनसे सोडल्यानंतर ते काही काळ वसंत मोरे यांच्यासोबत होते. मात्र राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे पंजाबी यांनी वसंत मोरे यांचीही साथ सोडली.
Web Title: Former Mns Leader Shahabaz Punjabi Enters In Shivsena During Sanjay Raut Rally In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..