esakal | माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांच्या प्रेरणेतून ५ हजार महिला आत्मनिर्भर
sakal

बोलून बातमी शोधा

माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांच्या प्रेरणेतून ५ हजार महिला आत्मनिर्भर

माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांच्या प्रेरणेतून ५ हजार महिला आत्मनिर्भर

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांच्या प्रेरणेने सन २०१६ साली स्थापना झालेल्या इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबलट्रस्ट च्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल घटकातील ५ हजार महिलाआत्मनिर्भर झाल्या तर दीड हजार महिलांना रोजगाराची संधी मिळाली असल्याची माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांनी दिली. माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पंधराव्या स्मृतीदिना निमित्त इंदापूर येथे कै. पाटील यांच्या प्रतिमेस पद्माताई भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुनअभिवादन केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अरविंदगारटकर ,अमोल राऊत, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

पद्माताई भोसले पुढे म्हणाल्या, इंदापूर तालुका व परिसरात ट्रस्टचे महिला सक्षमी करणात मोठे योगदान आहे. संस्थेच्याआरोग्य केंद्रात आतापर्यंत ७८३० ऊसतोडणी कामगार व हजारो विद्यार्थ्यांची मोफत आरोग्यतपासणी करण्यात आली. त्याचबरोबर कौशल्यविकास योजनेअंतर्गत नऊशेहून जास्त महिलांनामोफत व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. कोरोना महामारीत शैक्षणिक उपक्रम बंद असताना शंकरराव पाटील अक्षय शिक्षण योजनेअंतर्गत ५०० हून जास्त गरजू व होतकरुविद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन कौशल्यप्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा: "जे ममता बॅनर्जी-मायावतींनी करुन दाखवलं ते पवारांना जमलं नाही"

यातील अनेक विद्यार्थी उद्योग व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भर झाले तर दिनदयाळ उपाध्याय ग्रामिण कौशल्य विकास योजना, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महा मंडळ, सारथी कौशल्य विकासयोजना,प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान आणि जावेद हबीब हेअर ॲण्ड ब्युटी ॲकेडमीच्या मान्यतेने महिला व विद्यार्थ्यांसाठी सतराहून जास्त प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम वर्ग घेतले जातात. यातून महिलांचा व्यक्तीमत्व विकास होतो.

हेही वाचा: OBC आरक्षणाशिवायच होणार ZP निवडणुका, तारीख जाहीर

तसेच महिला आर्थिक सक्षम होऊन कुटूंबाची आर्थिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडतात. सन २०१८ साली बारामती येथे ट्रस्टच्या सायन्स ॲण्ड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज ची स्थापना करण्यात आली असून येथे ग्रामिण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येते. कमवा व शिका योजने अंतर्गत कॉम्प्युटर, सॉफ्टस्किल कोर्सेस घेण्यात येतात.शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात ट्रस्ट पुढील काळात मोठे उद्दिष्ठ ठेवून नियोजन करत असल्याचे शेवटी पद्माताई भोसले यांनी सांगितले.

loading image
go to top