'त्या' कोरोनाग्रस्त महिलेला अखेर माजी सरपंचांकडून अग्नी; महिलेचा परिवार गहिवरला

former sarpanch of shikrapur did funeral of Corona positive woman
former sarpanch of shikrapur did funeral of Corona positive woman

शिक्रापूर ( पुणे ) :कोरोनाने मृत पावलेल्या तुळजापूर (ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) येथील सुवर्णा तोरखडे नामक महिलेच्या अंत्यसंस्काराला जिथे प्रशासननाने कच खाल्ली तिथे येथील माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी पुढाकार घेतला आणि पीपीई किट घालून स्वत: या महिलेचा अंत्यसंस्कार केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंत्यविधीमध्ये मुलाने अग्नी देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मात्र, कोरोनाने एका माजी सरपंचाला मुलाच्या भूमिकेत नेले आणि दिवंगत तोरखडे यांच्या मुलासह संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने हा प्रसंगही भावूक होवून गेला. 

'कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह रुग्णालयात पडून..’ या मथळ्याचे रविवारी प्रसिध्द झालेले सकाळमधील वृत्त ज्या महिलेचे होते त्या तुळजापूर येथील सुवर्णा तोरखडे. त्यांना बुधवारी (ता.२९) कारेगाव (ता.शिरूर) येथील खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी पुण्यात पाठविले असता त्यांची तब्बेत अत्यवस्थ झाल्याने शिक्रापूरातील खाजगी रुग्णालयात त्यांचा चिरंजी शाम तोरखडे यांनी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सुवर्णा तोरखडे यांचे निधन झाले आणि त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनामुळे सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तुळजापूरला नेता येत नसल्याने आणि कोरोनाबाधितांचा अंत्यविधी कसा करायचा याबाबत स्पष्ट सुचना नसल्याने दोन दिवस हा मृतदेह आईसबॉक्समध्ये तसाच ठेवण्यात आला. दरम्यान, याबाबत गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग यांचेकडून काहीच हालचाल होईना.

पुण्यात बसची वाट पाहत होती महिला, लिफ्ट देतो म्हणाला आणि 

पुणेकरांनो, शक्यतो घरातच राहा! बाहेर जाणार असला तर, महत्त्वाची बातमी वाचा

अखेर येथील माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी स्वत: पीपीई किट मागवून घेतले व दिवंगत सुवर्णा तोरखडे यांना रविवारी (ता.२) स्वत: अग्नी दिला. हिंदू संस्कृतीत मुलाच्या हातून अग्नी देण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाने जगातील सर्वच परंपरा-चाली रितींच्या व्याख्या बदलताना शिक्रापूरात माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनाच मुलगा म्हणून अग्नी द्यावा लागला आणि तब्बल दोन तास चाललेली ही तोरखडे परिवाराची परवड संपत असताना अग्नीदहनाचा हा प्रसंग मात्र भावूक होवून गेला.

शिक्रापूर पोलिसांनीही ​या प्रसंगात सहकार्य केल्याची माहिती तोरखडे परिवाराने दिली. दरम्यान, सकाळच्या बातमीनंतर महसूल व आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आणि प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामसेवक तसेच तळेगाव-ढमढेरे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, सदर रुग्ण कारेगाव येथील खाजगी रुग्णालयातून आल्याने रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राशी या प्रकरणाचा कुठलाही संबंध नसल्याचे डॉ. स्नेहल घोडेराव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com