Pune : माजी तहसीलदार दिनकर निकम यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी तहसीलदार दिनकर निकम यांचे निधन

Pune : माजी तहसीलदार दिनकर निकम यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : निवृत्त तहसीलदार आणि अहमदनगर जिल्हा राज्य कर्मचारी आणि संयुक्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनकर तुकाराम निकम (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (ता. १२) पुण्यात निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हेही वाचा: हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

निकम यांनी अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्याचे तहसीलदार म्हणून चांगली कामगिरी बजावली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिलकुमार लखिना यांनी दुष्काळी तालुक्यात केलेल्या कामाबद्दल त्यांचा सत्कार केला होता. अहमदनगर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.

हेही वाचा: नक्षलवादाला शहरी चेहरा देण्याचा मिलिंद तेलतुंबडेचा प्रयत्न

१९७० साली संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपाचे नेतृत्व निकम यांनी केले होते आणि त्यात त्यांना अल्पकाळ तुरुंगवासही भोगावा लागला. अहमदनगर जिल्ह्यातील नाट्यकर्मी मधुकर तोरडमल यांच्याबरोबर रंगभूमीवरही त्यांनी काही काळ काम केले होते.

loading image
go to top