किल्ल्यांची माती, कलश शिवस्मारकासाठी मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

पुणे - ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ’ अशा घोषणांच्या निनादात पुणे आणि सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व गड-किल्ल्यांवरून एकत्रित केलेली पवित्र माती आणि पाण्याच्या कलशाचे पूजन लालमहालात करण्यात आले. मुंबईत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन व जलपूजन सोहळ्यासाठी माती व पाणी शिवसंग्राम संघटनेने मिरवणुकीद्वारे आज पाठविले. 

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून लालमहालात हा कार्यक्रम आयोजिला होता. या वेळी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद पवार, शिवसंग्रामचे प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड, संपर्कप्रमुख तुषार काकडे, महेंद्र कडू, किरण ओहोळ, बाळासाहेब अमराळे, चेतन भालेकर, रवींद्र भोसले आदी उपस्थित होते. लालमहालातून निघालेल्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे कलश रथातून मुंबईकडे मार्गस्थ झाले. 

शहराध्यक्ष लगड म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड तसेच सातारा जिल्ह्यातील किल्ल्यावरील माती व पाणी एकत्र करून कलश तयार केले. तसेच जेजुरी, देहू आणि आळंदी येथील पवित्र पाणी संकलित केले आहे.’’ 

शेखर पवार म्हणाले, ‘‘शिवस्मारकाचे बऱ्याच वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. शिवस्मारक ही जगासाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे.’’

Web Title: fort soil, Kalash for shivsmarak in mumbai