टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधनाची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे - प्लॅस्टिक कचऱ्याचा पुन्हा वापर आणि त्याचे होणारे प्रदूषण टाळता येईल का, या विचारातून पुण्यात टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीच्या कामास सुरवात झाली. त्यातून स्वस्तात आणि कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाची निर्मिती करणारे ‘पायरॉलिसिस युनिट’ तयार झाले. हे साकार झालंय पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क’च्या जीडी एन्व्हॉयर्न्मेंटल प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपमुळे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या साह्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात ‘सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क’ कार्यरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन, त्यावरील उपाय म्हणून पायरॉलिसिस युनिट तयार केले आहे. त्याच्या साह्याने कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून त्यापासून तेल बनविणे शक्‍य होत आहे.

अशी होते इंधननिर्मिती
प्लॅस्टिक गोळा करून युनिटमध्ये टाकण्यात येते. ते वेगाने वितळण्यासाठी त्यात स्वतंत्र यंत्रणा आहे. एकीकडे प्लॅस्टिक वितळून त्यातून गॅस बाहेर येतो, तर दुसरीकडे प्लॅस्टिकपासून तेलनिर्मिती होते. या प्रकल्पातून बाहेर पडणारा वायू इंधन म्हणून पुन्हा प्रकल्पात वापरला जातो तर तेलाची इंधन म्हणून विक्री केली जाते.

वापरण्यात येणारे प्लॅस्टिक 
प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या, डबे, बाटल्या, मोडकी खेळणी, प्लॅस्टिकची भांडी, थर्माकोल आणि अन्य टाकाऊ वस्तू

‘पायरॉलिसिस युनिट’मध्ये कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक वितळून त्यापासून गॅस किंवा तेल निर्मिती शक्‍य आहे. पिरंगुट येथे सध्या हे युनिट कार्यान्वित आहे. भीमाशंकर अभयारण्यात हे युनिट बसविण्यासंदर्भात वन विभाग, ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅस्टिकची समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेनेही युनिट बसविण्याबाबत चर्चा केली आहे.
- डॉ. राजेंद्र जगदाळे, महासंचालक, सायन्स आणि टेक्‍नॉलॉजी पार्क

पिरंगुटमध्ये कार्यान्वित असलेल्या प्रकल्पात पिरंगुट ग्रामपंचायत, इनोरा ग्रुप आणि मुंबईतील निर्भया ग्रुप यांच्यामार्फत प्लॅस्टिक कचरा संकलित केला जातो. संकलित झालेल्या प्लॅस्टिकचे वर्गीकरण करून, त्यावर प्रक्रिया केले जाते. साधारणपणे प्लॅस्टिकच्या कचऱ्याच्या ४० टक्के तेलनिर्मिती करणे शक्‍य होते. 
- अजित गाडगीळ, संचालक, जीडी एन्व्हॉयर्न्मेंटल प्रायव्हेट लि.

Web Title: Fossil production from waste plastic