esakal | खेड-शिवापूर : पिस्तुल जप्त करत चौघांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

crime
खेड-शिवापूर : पिस्तुल जप्त करत चौघांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : राजगड पोलिसांनी रविवारी खेड-शिवापूर (ता. हवेली) येथे चार सराईत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या चार जणांकडून उस्मानाबाद येथे केलेल्या गुन्ह्यातील पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी चार जणांवर राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिपक धनाजी जगताप (वय 26), ऋषिकेश सुनिल रणपिसे ( वय 22), यश गणेश देवकर ( वय 21, तिघेही रा. रांजे ता भोर जि पुणे) आणि गणेश सुरेश शेळके (वय 21, रा. आर्वी, ता. हवेली जि पुणे ) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. खेड-शिवापूर (ता.हवेली) गावच्या हद्दीत कोंढणपुर फाटा येथील पुलाखाली दोन मोटार सायकलवर चार संशयित अनोळखी इसम थांबले असल्याची माहिती पोलीस हवालदार संतोष तोडकर यांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्या अनोळखी इसमांची चौकशी केली. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन ते पळुन जात असताना राजगड पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता दिपक जगताप याच्या कमरेला पाठीमागील बाजुस एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील एक पिस्तुल आणि दोन काडतुसे, दोन मोटार सायकल असा ऐवज जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी चार जणांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार जणांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी या गावात पिस्तुलमधून गोळी झाडुन एक इसमास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर प्रकरणी उस्मानाबाद पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे राजगड पोलिसांनी सांगितले. राजगडचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे, फौजदार निखिल मगदूम, पोलीस हवालदार संतोष तोडकर, राहुल कोल्हे, मनोज कोकणी, शिवलिंग कारंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा: हवेलीकरांनो, पुणे आणि पिपरी चिंचवडला जाण्यापूर्वी हे वाचा...