esakal | पट्टेरी वाघाचे कातडे विकणाऱ्या चौघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पट्टेरी वाघाचे कातडे विकणाऱ्या चौघांना अटक

sakal_logo
By
किरण भदे

पुणे : सातारा महामार्गावर साऱोळा उड्डाणपुलाखाली पट्टेऱी वाघाची कातडी (tiger skins)विकण्यासाठी आलेल्या चौघांना स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन वाघाच्या कातड्यासह एकुण 5 लाख 26 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seizure of money)करण्यात आला असून आरोपींना राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दिनेश अशोक फरांदे (वय 38) हसन रज्जाक मुल्ला (वय 35) दोघेही रा.ओझर्डे ता.वाई जि.सातारा, गणपत सदु जुनगरे (वय 45) रा.देवदेव ता.जावळी जि,सातारा सुनिल दिनकर भिलारे (वय 52) रा.भिलार ता.महाबळेश्वर जि.सातारा या चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचुन अटक केली आहे. (Four arrested for selling tiger skins)

या बाबत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना पुणे सातारा रोडवर सारोळा ब्रिज खाली काही इसम पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करुन विक्री साठी येणार असल्याची माहीती मिळाल्यावर त्यांच्या पथकाने आज सकाळी सात वाजता सारोळा ब्रिज खाली सापळा लावला व विक्री करण्यासाठी आलेले चौघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. या आरोपींच्या ताब्यात चार फुट लांबीचे दिड फुट रुंदीचे वरच्या जबड्यात 13 दात व खालच्या जबड्यात 16 दात असलेले पट्टेरी वाघाचे कातडे एक मोटारसायकल व चार मोबाईल फोन असे एकुण 5 लाख 26 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोहली-स्मिथ-विलीयमसन : मैदानात प्रखर शत्रू तर बाहेर निखळ मित्र!

या कारवाईसाठी नसरापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात येऊन त्यांना माहीती देण्यात आली. आरोपींना पुढील कारवाईसाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, अमोल गोरे हवालदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, गुरु जाधव, अमोल शेडगे,मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे महिला पोलिस पुनम गुंड यांनी कारवाईत भाग घेतला

loading image
go to top