निरनिराळ्या घटनांमध्ये लोणावळ्यात चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

लोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले.

लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे यार्डात मालगाडीखाली सापडल्याने येथील किशोर सोपान टेमघरे (वय ५०, रा. नांगरगाव, लोणावळा) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. ८) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. टेमघरे हे यार्डात मालगाडीखालून रेल्वेरूळ ओलांडत होते. त्या वेळी गाडी सुरू झाल्याने ते गाडीखाली सापडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

दुसऱ्या घटनेत दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र शिवलिंग माने (वय ३३, रा. आनंदनगर, अंबरनाथ, ठाणे) असे मृताचे नाव आहे. राजेंद्र माने हे लोकल येत असताना रेल्वे रूळ ओलांडून फलाटावर चढण्याच्या प्रयत्नात होते. परंतु लोकलची धडक बसल्याने माने यांचा जागीच मृत्यू झाला. 

तिसऱ्या घटनेत फलाट क्रमांक दोनवर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला. मृताचे वय अंदाजे पन्नास वर्षे असून, अद्याप ओळख पटलेली नाही. कुठल्यातरी रोगाने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली. 

चौथ्या घटनेत मुंबई-भुवनेश्‍वर कोणार्क एक्‍स्प्रेसमधून प्रवास करणारे दिलीप देवराज स्वाइन (वय ३२, रा. कल्याण, मूळगाव - ओडिशा) यांचा अकस्मात मृत्यू झाला. स्वाइन आजारी असल्याने मूळ गावी जात असताना लोणावळ्याजवळ कोणार्क एक्‍स्प्रेस गाडीत त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

मोटारसायकल खाक
वडगाव मावळ - पुणे-मुंबई महामार्गावरील येथे मंगळवारी सायंकाळी पेट्रोल पंपावरच मोटारसायकलला आग लागून ती जळून खाक झाली. चिन्मय घाटे (रा. अंधेरी, मुंबई) असे मोटारसायकल मालकाचे नाव आहे. येथील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरले. त्यानंतर पेट्रोल पंपावरच गाडीने पेट घेतला. स्थानिक युवक व नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी पाण्याचा टॅंकर पाठवला. चालक संजय जगताप यांनी आग आटोक्‍यात आणली. परंतु या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली.

Web Title: Four cases of death in Lonavala in various cases