Pune News : चार अत्यवस्थ आंदोलक रुग्णालयात दाखल; आदिवासी विद्यार्थ्यांचे ११ दिवसांपासून बेमुदत उपोषण

सरकारने २०११ मध्ये घेतलेला शासन निर्णय लागू करण्यासह विविध ४० मागण्यांसाठी मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अकरा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे.
Tribal Students Strike

Tribal Students Strike

sakal

Updated on

पुणे/मांजरी - सरकारने २०११ मध्ये घेतलेला शासन निर्णय लागू करण्यासह विविध ४० मागण्यांसाठी मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अकरा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यातील चार अत्यवस्थ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर रविवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सोमवारी (ता. २४) सायंकाळपर्यंत सरकारने याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com