esakal | वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत

बोलून बातमी शोधा

Nasrapur girls
भोर : वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत
sakal_logo
By
किरण भदे ः सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : नसरापूर (चेलाडी फाटा, ता. भोर) (Nasrapur)येथे वीज अंगावर कोसळून आदिवासी (Tribal) कातकरी समाजातील दोन मृत झालेल्या मुलींच्या कुटुंबांना शासकीय प्रत्येकी चार लाख रुपये मदत तहसीलदार अजित पाटील (Tehsildar Ajit Patil) यांनी जाहीर केली असून, या वस्ती वरील नागरीकांना जातीचे दाखले आणि पक्की घरे देण्यासाठी आदेश दिले आहे. (four lakh each to the families of the girls killed in the power outage).

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

रविवारी झालेल्या घटनेत वीज अंगावर पडून सीमा अरुण हिलम वय ११, अनिता सिंकदर मोरे वय ९ दोघेही रा. नसरापूर चेलाडी फाटा येथील या शाळकरी मुली ठार झाल्या होत्या. चांदणी प्रकाश जाधव वय ९ असे किरकोळ जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. या पार्श्वभुमीवर भोर तहसिलदार अजित पाटील यांनी मृत कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे, सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहूनाना शेलार, गटविकास अधिकारी विशाल तनपूरे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंड्डेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, पोलीस हवालदार प्रमोद भोसले, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी सदस्य संंदीप कदम, नामदेव चव्हाण, सुुधीर वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्र्वर झोरे, अनिल शेटे, ऋषिकेश खेडेकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

तहसीलदार अजित पाटील यांनी पाहणी करून आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले. यावेळी नामदेव चव्हाण व ज्ञानेश्र्वर झोरे यांनी येथील कातकरी समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याची बाब तहसीलदार यांच्या समोर आणून दिली. पाटील यांनी तत्काळ जातीचे दाखले देण्यासाठी जुन्या नोंदी व लागणारे पुरावे जमा करून तसेच त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेत कायम वास्तव्य करण्याचे सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. तर गटविकास अधिकारी विशाल तनपूरे यांनी या समाजातील लोकांना पक्के घरे मिळवून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव करणार असल्याची माहिती दिली. सभापती दमयंती जाधव व उपसभापती लहूनाना शेलार यांनी मृत मुलींच्या कुटुंबांना लागणारे २५ हजार रुपयांचे घरगुती साहित्य तातडीने देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, काल दुर्घटनाग्रस्त दोन्ही मुलींचा अंत्यविधी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला तसेच वस्ती वरील सर्व कुटुंबीयांसाठी सायंकाळचे जेवणाची व्यवस्था देखील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.