चार मराठी तरुणांची ‘एनडीए’मध्ये निवड

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४५व्या तुकडीत चार मराठी तरुणांची निवड झाली.
Marathi Youth
Marathi YouthSakal

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) (NDA) १४५ व्या तुकडीत चार मराठी तरुणांची (Marathi Youth) निवड (Selection) झाली. यामध्ये सोहम बाचल (पुणे), सुमीत कदम (सातारा), सागर जपे (कोपरगाव) आणि मयूरेश पाटील (जळगाव) या तरुणांचा समावेश आहे. (Four Marathi Youth Select in NDA)

सिंहगड रस्ता येथील सोहम बाचल हा अखिल भारतीय गुणवत्ता यादीत ३१९ व्या क्रमांकावर असून एनडीएच्या आर्मी विंगचा कॅडेट म्हणून दाखल झाला आहे. सुमीत हा साताऱ्याच्या सैनिक स्कूलचा विद्यार्थी आहे. देशाच्या गुणवत्ता यादीत त्याने १२८व्या क्रमांकावर असून तो आर्मी विंगचा कॅडेट म्हणून एनडीएत दाखल झाला आहे.

Marathi Youth
शिवसेना सभापतीचा सिंहगडमध्ये हॉटेलवर हल्ला; महिलांनाही मारहाण

मयूरेश गुणवत्ता यादीत २७४ व्या क्रमांकावर असून एनडीएमध्ये तो नेव्हल कॅडेट म्हणून दाखल झाला आहे. सागर याने बारावीचे शिक्षण पानागढ येथील आर्मी पब्लिक स्कूलमधून केले होते. तो १६ मे रोजी एनडीएत आर्मी कॅडेट म्हणून प्रशिक्षणासाठी दाखल झाला आहे.

दरम्यान, एनडीएची परिक्षा उत्तीर्ण करून पुण्यातील जपमन अवतार हा नुकताच नेव्हल ॲकॅडमीत दाखल झाला आहे. त्याने सदाशिव पेठेतील राव ज्युनिअर कॉलेजमधून अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण करत बारावीत ६९ टक्के गुण मिळविले होते. या सर्वांना एसएसबी मुलाखतीसाठी ॲपेक्स करिअर्सचे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com