भीक मागण्यासाठी चार महिन्यांचे बाळ पळविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी झोपलेल्या एका महिला प्रवाशाच्या चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेस लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. संबंधित महिला मुंबईतील जोगेश्‍वरी येथील पुलाखाली बाळाला घेऊन भीक मागत असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला सापळा रचून पकडले. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी बाळाला त्याच्या आईकडे सोपविले.

याप्रकरणी संगीता आनंद कंग (वय २५, रा. कोपार्डे, करवीर, कोल्हापूर) यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी मनीषा महेश काळे (वय २५, रा. हडपसर रेल्वे स्थानक झोपडपट्टी, मूळ भूतकरवाडी, भिंगार, अहमदनगर) हिला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता या पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा चार महिन्यांचा मुलगा प्रमोद याला घेऊन पुण्यात आल्या होत्या. १७ ऑगस्टला त्या पुणे रेल्वे स्थानकावरील दोन क्रमांकाच्या फलाटाजवळील पुस्तकांच्या दुकानाजवळ झोपल्या. मध्यरात्री त्यांच्याजवळ असलेल्या बाळाला अनोळखी व्यक्तीने पळवून नेल्याचे सकाळी त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली.

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणातून महिलेचे छायाचित्र मिळवून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी रेल्वे स्थानक परिसरातील सर्व भिक्षेकऱ्यांकडे चौकशी केली. त्यानंतर दत्त मंदिर, मंडई व अन्य गर्दीच्या ठिकाणी असलेल्या भिक्षेकऱ्यांकडेही शोध घेतला. दरम्यान, एक महिला छोट्या बाळासह बकरी जोगेश्‍वरी येथील पुलाखाली भीक मागत असल्याची माहिती पोलिसांना एका महिलेकडून मिळाली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने महिलेस ताब्यात घेतले. लहान बाळामुळे जास्त भीक मिळत असल्याचे कारण सांगत बाळ पळवून नेल्याचे तिने कबूल केले. 

मला तीन मुले आहेत. गावाकडे उदरनिर्वाहाचे साधन नाही. त्यामुळे मोठी दोन मुले गावाला बहिणीकडे ठेवून चार महिन्यांच्या बाळाला घेऊन मी पंधरा दिवसांपूर्वी पुण्याला आले. रेल्वे स्थानक परिसरातच भीक मागून उदरनिर्वाह भागविते. १७ तारखेला रात्री झोपल्यानंतर माझ्या बाळाला पळवून नेले होते.
- संगीता कंग, बाळाची आई

Web Title: four month old baby kidnapping for Begging