पुणे : कोरोनाला रोखण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी कसली कंबर; आणखी चार आयएएस अधिकारी केले तैनात!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) हद्दीतील कोरोना तपासणी मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणे.

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील आणखी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Breaking : लॉकडाऊनबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी केली मोठी घोषणा; वाचा सविस्तर बातमी!​

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव विश्वजीत माने यांच्याकडे पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे ग्रामीण व छावणी (कॅन्टोंमेंट) हद्दीतील कोरोना तपासणी मान्यताप्राप्त लॅबवर नियंत्रण ठेवणे. या लॅबमध्ये कोरोना चाचणीची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, तसेच या लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने तपासण्या होतात किंवा नाही याची तपासणी करणे. कोरोना चाचणीचा निर्णय कळण्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!​

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे पॉझिटिव्ह रुग्ण निदर्शनास येतात, अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना शोधून काढून आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आदिवासी संशोधन व  प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्याकडे बाधित रुग्णांना बेडसाठी इतरत्र फिरावे लागू नये. रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे सामाजिक संस्थांची मदत घेवून सुनियोजित पद्धतीने लोकसहभाग वाढविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four more IAS officers have been appointed for the prevention of corona infection in Pune said Divisional Commissioner Dr Deepak Mhaisekar