अवैध दारूसाठ्याप्रकरणी चार अधिकारी निलंबित

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उमाप यांची कारवाई.
narayangaon police
narayangaon police sakal

नारायणगाव : शिरूर व जुन्नर तालुक्यात विना वाहतूक पास मद्यसाठा (Alcohol stock in narayangaon) आढळून आल्याने परवानाधारक परमिट रूम व बिअरबारचे (permit room and bierbar) नियंत्रण व नियमन करण्यात दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व दोन जवान यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क (State excise duty) आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केली आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे निरीक्षक जी.डी. कुचेकर, दुय्यम निरीक्षक ए. ई. तातळे,जवान विजय घुंदरे, दिलीप केकरे यांना निलंबित करण्यात आले आहे. (police suspended) या बाबत दिलेल्या आदेशात म्हटले आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई, ठाणे भरारी पथकाने तसेच पुणे येथील विभागीय उपयुक्त यांनी शिरूर व जुन्नर तालुक्यातील परमिट रूम व बिअरबारचे निरीक्षण केले. या वेळी शिरूर तालुक्यातील हॉटेल आर. जी., हॉटेल आयुष, हॉटेल पल्लवी, हॉटेल जय भवानी जुन्नर तालुक्यातील दीपक परमिट रूम, मे. पूनम परमिट रूम, मे. कपिल परमिट रूम, मे. के. पी. मिसाळ, मे. हॉटेल प्रशांत या नऊ परमिट रूम व बिअरबार मध्ये विना वाहतूक परवाना, विना वाहतूक पासचे ३७८ बॉक्स विदेशी मद्यसाठा व १४७ विदेशी मद्य व बियर बाटल्या आढळून आल्या.

narayangaon police
बारामतीत जनजीवन पूर्वपदावर आणावे; व्यापा-यांची मागणी

कारवाईच्या वेळी संबधीत हॉटेल मालकांना नमुना हिशोबाच्या नोंद वह्या, परिवहन पास, शेरे पुस्तक आदी सादर करू शकले नाहीत. मद्यविक्रीच्या या बेकायदेशीर व्यवसायामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत होते. त्याचबरोबर हे मद्य विहित मार्गाने प्राप्त होत नसल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. या मुळे शासनाची प्रतिमा मालिन होते. या बाबत वेळोवेळी सूचना देऊन देखील परवानाधारक परमिट रूम व बिअरबारचे नियंत्रण व नियमन करण्यात दुर्लक्ष करून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने राज्य उत्पादन शुल्क आयुक्त उमाप यांनी निरीक्षक कुचेकर, दुय्यम निरीक्षक तातळे, जवान घुंदरे, केकरे यांना करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com