पुण्यात एकूण कोरोनारुग्ण चार; दाम्पत्याची मुलगी, ओला ड्रायव्हरलाही लागण 

टीम ई-सकाळ
Tuesday, 10 March 2020

या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली.

पुणे : पुण्यात दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिली होती. आता त्यात आणखी तिघांची भर पडली असून, शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या दोघांच्या संपर्कातील आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आलंय.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुबईहून पुण्यात परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काल सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिली होती. या दाम्पत्यावर नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. आता या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यात दाम्पत्याची मुलगी आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या ओला ड्रायव्हरला अशा चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. या दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 4 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

आणखी वाचा - ज्योतिरादित्यांची बंडखोरी की काँग्रेसचं अपयश?

आणखी वाचा - ज्योतिरादित्यांचा राजीनामा आणि काँग्रेसची माधवराव शिंदेंना आदरांजली

देशात कोठे काय घडले?

  • काश्मीरमध्ये इराण आणि चीनहून परतलेले बडगाम जिल्ह्यातील ४१ नागरिक नऊ विलगीकरण कक्षात दाखल
  • कर्नाटकमध्ये आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले
  • कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आरोग्य विमा 
  • केरळमध्ये कोरोना व्हायरसचे नव्याने सहा रुग्ण आढळून आले
  • कोची येथे युरोपाहून परतलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाला कोरोनाची बाधा
  • केरळमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 12वर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four people affected coronavirus pune city daughter and ola driver