पार्कींगच्या वादातून एकास लाकडी दांडके अन् कोयत्याने मारहाण करणाऱ्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

फिर्यादी रविवारी रात्री अकरा वाजता शिवदर्शन येथील प्रिन्स हेअर कटींग दुकानासमोर त्यांच्या मित्रासमवेत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीबरोबर गाडी पार्कींग करण्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

पुणे : रस्त्याच्याकडेला गाडी पार्कींग करण्याच्या वादातून चौघांनी तरुणासह दोघांवर लाकडी दांडके व कोयत्याने वार केले. या प्रकरणातील चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजता शिवदर्शन येथे घडली होती. 

आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन
 
पृथ्वीराज मिलींद बेंद्रे (वय 19), मिलींद किसनराव बेंद्रे (वय 54, दोघेही रा. शिवदर्शन, तावरे कॉलनी), सिध्दार्थ संजय पलंगे (वय 20, रा. पंचशील अपार्टमेंट, धनकवडी), महेश श्‍यामसुंदर जमदाडे (वय 19, रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

पुणे : वडगाव शेरीत भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू 

याप्रकरणी सुनिल पिसे (वय 30, रा. पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी रात्री अकरा वाजता शिवदर्शन येथील प्रिन्स हेअर कटींग दुकानासमोर त्यांच्या मित्रासमवेत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीबरोबर गाडी पार्कींग करण्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्‍यात वार केला. तर धनंजय डिंबळे यांना मिलिद बेंद्रे व त्याचा भाचा सिध्दार्थ पलंगे यांनी पाठीत कोयत्याने वार करून जखमी केले. तर सिद्धार्थच्या मित्रांनी फिर्यादी यांना लाकडी दांडके व लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली

भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four persons arrested for beating over disputes of parking in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: