आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन

rickshaw driver commits suicide by strangling due to threatening to kill
rickshaw driver commits suicide by strangling due to threatening to kill

पुणे : रिक्षा रांगेत लावण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणानंतर रिक्षाचालकासह दोघांनी एका  रिक्षाचालकास व त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरून त्या रिक्षाचालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली. ही घटना जांभुळवाडी दरीपुलाजवळ सोमवारी दुपारी दोन वाजता घडली. 

सुनील रामचंद्र भरंगडे (वय 47, रा. राजगड कॉलनी, अय्यप्पा स्वामी मंदिरजवळ, संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सचिन दत्तात्रय अभंगराव (वय 30, रा. टेल्कोकॉलनी, दत्तनगर, आंबेगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आंबेगाव बुद्रूक येथील 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील सुनील भरंगडे यांची रिक्षाचालक सचिन अभंगराव याच्यासमवेत कात्रज येथील रिक्षा स्टॅन्टला रिक्षा रांगेत लावण्याच्या कारणावरुन पंधरा दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून अभंगराव व त्याच्या साथीदाराने फिर्यादी यांना शनिनगर चौकामध्ये गाठून "आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला व तुझ्या मुलाला मारुन टाकीन' अशा शब्दात जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे घाबरून फिर्यादी यांचे वडील सुनील भरंगडे यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता जांभुळवाडी येथील दरीपुलाजवळील तलावाच्या काठाला असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय

अभंगराव व त्याच्या साथीदाराने धमकी देत भरंगडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अभंगराव यास पोलिसांनी अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com