esakal | कोथरूडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; चार टपऱ्यांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

fire.jpg

कोथरूड पोलिस ठाण्याजवळ असलेल्या  टप-यांना पहाटे तीन वाजता आग लागली. या घटनेत चार टप-या व एका रीक्षाचे नुकसान झाले.

कोथरूडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; चार टपऱ्यांचे नुकसान

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरूड (पुणे) : कोथरूड पोलिस ठाण्याजवळ असलेल्या  टप-यांना पहाटे तीन वाजता आग लागली. या घटनेत चार टप-या व एका रीक्षाचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.

आणखी वाचा - बाप रे! लग्नातला फोटोग्राफर निघाला कोरोना पॉझिटिव्ह 

प्रविण बुरटे यांची गॅस दुरूस्तीची टपरी आहे. या टपरीतील सात सिलेंडरचा स्फोट झाला. शेजारी वसुंधरा शिंदे यांचे बॅग दुरूस्ती व आत्माराम घारे यांचे फुलाचे दुकान , व मच्छिंद्रनाथ फलटणकर यांचे जुन्या बॅग दुरूस्तीचे दुकान आहे. यातील बॅगांनी पेट घेतल्याने आग आणखी भडकली. या टप-यांजवळ कैलास नलवडे यांची सीएनजी रिक्षा होती. त्यांनी जीवाची पर्वा न करता रीक्षा बाजूला काढली. यामध्ये त्यांना थोडे भाजले मात्र  रिक्षाचे हुड काही प्रमाणात जळाले. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी गॅसच्या टाक्यांचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोथरूड पोलिस अधिक तपास करत आहेत.
  शेतीविकासासाठी पुणे झेडपी घेणार बारामतीच्या या संस्थेची मदत

पौडरस्त्यावर वडाच्या झाडाखाली या टप-या आहेत. सिलेंडरचा स्फोट झाला तरी झाडाच्या फांद्यामुळे टाक्या दूर उडाल्या नाहीत. टपरी जवळच्या घरातील गॅस सिलिंडर लांब नेले.  अग्निशमन दलाचे जवान, पोलिस यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.