esakal | शेतीविकासासाठी पुणे झेडपी घेणार बारामतीच्या या संस्थेची मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

शेतकऱ्यांचे उपन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सरकारचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने कार्यक्रम हाती घेतला जाईल.

शेतीविकासासाठी पुणे झेडपी घेणार बारामतीच्या या संस्थेची मदत 

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : शिक्षण, जलसंधारण आणि शेतीविकासाचा पाया मजबूत करण्यासाठी ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न झाले आहेत. शेतीविकासाचा हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी व अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद प्रशासन ट्रस्टच्या बरोबरीने ग्रामीण भागात कार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केले. 

मंगल कार्यालयात पुन्हा घुमणार सनईचे सूर

ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा परिषद व बारामती पंचायत समितीने कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी पानसरे बोलत होत्या. या वेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती पंचायत समिती सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वायकर, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, सदस्या रोहिणी तावरे, भारत खैरे, प्रदीप धापटे, शारदा खराडे, कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख, गटविकास अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते. 

मुळशीतील तिघे कोरोनामुक्त, मात्र आणखी...

शेतकऱ्यांचे उपन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सरकारचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने कार्यक्रम हाती घेतला जाईल. खरीप हंगामात शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर अवजारे देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती देवकाते यांनी दिली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी राजेंद्र पवार यांच्याशी संवाद साधला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  


शेतीविकासासाठी केव्हीकेचे कार्य मोठे आहे. येथील योजनांचा अभ्यास करून जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना अधिक जे काही देता येईल, ते देण्यासाठी आम्ही पदाधिकारी केव्हीकेशी सांगड घालून काम करणार आहोत. त्यातून शेती व शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळेल.  
 - निर्मला पानसरे, अध्यक्षा, पुणे जिल्हा परिषद