esakal | आळेफाटा येथे चार दुकाने आग लागल्याने भस्मसात

बोलून बातमी शोधा

आळेफाटा येथे चार दुकाने आग लागल्याने भस्मसात}

आगीत चारही दुकानामधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने, संबंधितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आळेफाटा येथे चार दुकाने आग लागल्याने भस्मसात
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळेफाटा : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे बुधवारी (ता. ३) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास, चार दुकानांना आग लागून ही दुकाने जळून खाक झाल्याने संबंधितांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक व नगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आळेफाटा येथील बसस्थानकासमोर हितेश सोनवणे यांचे जयगणेश हार्डवेअर, अमित बाम्हणे यांचे रूद्र प्लॅस्टिक, निलेश रायकर यांचे स्वस्तिक हेअर कटींग सलुन, तर योगेश बाम्हणे यांचे फ्रुट स्टाॅल ही दुकाने असून, या दुकानांना बुधवारी (ता. ३) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली.

पिंगळे वस्ती आग लागल्याने महावितरणच्या केबल जळून खाक 

आग विझविण्यासाठी जुन्नर नगर पालिकेचा व राजगुरुनगर पालिकेचा बंब बोलविण्यात आला. दरम्यान अथक प्रयत्नांनंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविण्यात यश आले, मात्र तोपर्यंत ही दुकाने आगीत जळून भस्मसात झाली.

पुण्यात 24 तासात आगीची दुसरी घटना; बिबवेवाडीत मंडप सजावटीच्या गोदाम भस्मसात

या आगीत चारही दुकानामधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने, संबंधितांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग विजेच्या शाॅकसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)