वालचंदनगरमध्ये चार दुकाने फोडली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे चोरट्यांनी चार दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. सराफी दुकानाची चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये जेरबंद झाले आहेत. रविवारी (ता. 18) पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी वालचंदनगर बाजारपेठेमध्ये धुमाकूळ घातला. येथील इम्राहिन शेख यांच्या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून 1100 रुपये रोख रक्कम चोरून नेली. 

विकास दोशी यांच्या खताच्या दुकानाचे शटर उचकटले. तसेच मिलिंद ताराचंद गांधी यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून 500 रुपये रोख रकमेची चोरी केली. येथील मनोहर पोतदार यांच्या शिवकर्मा ज्वेलर्स या सराफी दुकानाचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांनी दुकानातून काहीही चोरून नेले नाही. दुकानामध्ये प्रवेश करताना व शोधताना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे.

वालचंदनगर पोलिसांना चोरीची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, हवालदार मोहन फाळके, शिवाजी सातव, राजू जगदाळे, लखन साळवे, रूपेश नावडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीची माहिती घेतली. श्‍वान पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली आहे. 
 
Web Title: Four shops Robbed in Walchandnagar