साडवडमध्ये चार राज्यातील शेतकऱ्यांची शिवार फेरी

four state farmers went in saswad
four state farmers went in saswad

सासवड : महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यातून व मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यातून आलेल्या सुमारे दोनशे शेतकऱयांनी खास अभ्यासासाठी सीताफळाचे आगार असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शिवार फेरी केली. त्यांनी सीताफळ बागा, तोडणी, पॅकींग, घाऊक बाजार, प्रक्रीया, कोल्ड स्टोअरेज आदींना भेट देत, संशोधन केंद्रावर तब्बल तीन तासाचे तज्ज्ञांचे मार्गदर्शनही घेतले. सीताफळाच्या अनेक जातीही पाहील्या.

या शिवार फेरी व मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य कृषी परीषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते होते. महाराष्ट्र राज्य सीताफळ महासंघ व जयमल्हार फळ प्रक्रीया सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सीताफळ महासंघाचे राज्य अध्यक्ष श्याम गट्टाणी, पदाधिकारी एकनाथ आगे, अनिल बोंडे, धैर्यशिल सोळंकी, राजाभाऊ देशमुख, बी. डी. जडे, मधुकर डेहरनकर, रविंद्र काटोले, रविंद्र पाटील, माऊली मेमाणे, सागर काळे, देवराम काळे, माऊली खटाटे, शांताराम पोमण, बाळासाहेब इंदलकर, विलास कडलग, काका गायकवाड, बापुसाहेब शिंगाडे, नितीन इंगळे, सह्योगी संशोधक संचालक डॉ. विनय सुपे, अंजीर सीताफळ संशोधन केंद्राचे प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल लोहाटे, डॉ. गणपत इदाते, डॉ. प्रमोद जगताप, डॉ. गणेश बनसोडे आदी उपस्थित होते. 

सासवड (ता. पुरंदर) येथील शरद भवनपासून दौरा सुरु झाला. येथील सीताफळाच्या घाऊक बाजारातील उलाढाल जमलेल्या शेतकऱयांनी पाहीली. नंतर खरेदी फळांची पॅकींग पध्दती पाहीली. खळदला इग्लू कोल्ड स्टोअरेजला भेट दिली. तिथे माहिती घेतल्यानंतर नितीन इंगळे यांच्या वाळुंजला सीताफळ प्रक्रीया प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली. नवनाथ भापकर यांच्या आंबोडी - सोनोरी शिवेवरील सीताफळ बाग पाहीली. नंतर आंबोडी ते जाधववाडीपर्यंत अंजीर सीताफळ बागांच्या शिवारातून फेरफटका मारतच. सारे शेतकरी संशोधन केंद्रावर आले. तिथे अनेक सीताफळाच्या जाती पाहील्या. यावेळी डॉ. सुपे, डॉ. लोहाटे, डॉ. इदाते, डॉ. बनसोडे, डॉ. जगताप यांनी कृषी शास्त्रीय पध्दतीने सीताफळ व्यवस्थापन, रोग - किड व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. केंद्रावर माती परिक्षण व्हावे, असे रामचंद्र खेडेकर यांनी सूचविले. तर चर्चेअंती महिन्याच्या पहील्या शनिवारी संशोधन केंद्रावर शेतकरी व शास्त्रज्ञ चर्चा व सुसंवाद करण्याचा निर्णय यावेळी झाला. प्रास्ताविक माऊली मेमाणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. लोहाटे यांनी केले. सागर काळे यांनी आभार मानले. 

सीताफळाच्या फुले पुरंदर व फुले जानकी जाती लवकरच शेतकऱयांपर्यंत.. 

'फुले पुरंदर' या सीताफळाची राहुरी कृषी विद्यापीठाने संकलीत नव्या जातीची रोपे आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. 'फुले जानकी' टिकाऊ क्षमता अधिक असल्याने त्याचीही रोपे पुढील वर्षी उपलब्ध होतील, असे डॉ. विनय सुपे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com