esakal | डाॅक्टरांची कमाल : चार वर्षांच्या मुलाने गिळलेले नाणे काढले वीस मिनिटात बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

डाॅक्टरांची कमाल : चार वर्षांच्या मुलाने गिळलेले नाणे काढले वीस मिनिटात बाहेर

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार व कान-नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने यांना तातडीने येण्याची विनंती केली. हे दोघेही वेगाने मुथा यांच्या दवाखान्यात पोहोचले आणि मग सुरु झाली तयारी हे नाणे काढण्याची. 

डाॅक्टरांची कमाल : चार वर्षांच्या मुलाने गिळलेले नाणे काढले वीस मिनिटात बाहेर

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : ....स्थळ बारामतीतील डॉ. राजेंद्र मुथा यांचे हॉस्पिटल...अचानकच एका चार वर्षांच्या मुलाला घेऊन पालक घाईघाईने येतात....पालक आणि मुलगा दोघेही कमालीचे घाबरलेले. या मुलाने दोन रुपयांचे नाणे गिळलेले असते आणि त्याला त्रास सुरु झाला.. नाणे छातीत अडकून बसल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता व उलटीही होत होती. त्याची स्थिती पाहून डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा यांनी तातडीने त्याचा एक्सरे काढला तेव्हा त्याच्या छातीत नाणे असल्याचे दिसले. 

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार व कान-नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने यांना तातडीने येण्याची विनंती केली. हे दोघेही वेगाने मुथा यांच्या दवाखान्यात पोहोचले आणि मग सुरु झाली तयारी हे नाणे काढण्याची. 

या चार वर्षीय बालकाला भूल देऊन त्याच्या छातीतील नाणे या सर्व डॉक्टरांच्या पथकाने काही वेळातच कोणतीही शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीच्या मदतीने वीस मिनिटात बाहेर काढले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दोन दिवसात नाणी गिळलेली दोन छोटी मुले आपल्याकडे आली होती. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाणी गिळण्यासह, शेंगदाणा, फुटाणा घशात अडकणे, शिट्टी गिळणे अशाही बालकांवर मुथा पितापुत्रांनी लीलया उपचार केले आहे. डॉ. वैभव मदने व डॉ. अमर पवार यांनीही या सर्वच वेळेस मोलाचे सहकार्य केल्याचे मुथा यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)