esakal | कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय पुणे येथे अटक केलेल्या आरोपींसह पोलिस पथक.

कापुरव्होळ ता. भोर येथील बालाजी ज्वेलर्स मध्ये 17 लाख 32 हजार किंमतीच्या सोन्याची लुटीसह पळशी, ता. बारामती येथुन कुलथे ज्वेलर्सची 11 लाख 65 हजार रुपयांची सोन्याचांदीची लुट. तसेच, निरा, ता. पुरंदर येथील अँमेझाँन स्टोअर्स मधुन मोबाईल डिव्हीआर असा 77 हजार रुपयांच्या वस्तुंची चोरी, यासह बारामती, जेजुरी, राजगड, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे, जबरी चोरी असे गुन्हे करणारया आरोपींचा तपास लावण्यात जिल्हा गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना यश आले.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नसरापूर - कापुरव्होळ ता. भोर येथील बालाजी ज्वेलर्स मध्ये 17 लाख 32 हजार किंमतीच्या सोन्याची लुटीसह पळशी, ता. बारामती येथुन कुलथे ज्वेलर्सची 11 लाख 65 हजार रुपयांची सोन्याचांदीची लुट. तसेच, निरा, ता. पुरंदर येथील अँमेझाँन स्टोअर्स मधुन मोबाईल डिव्हीआर असा 77 हजार रुपयांच्या वस्तुंची चोरी, यासह बारामती, जेजुरी, राजगड, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडे, जबरी चोरी असे गुन्हे करणारया आरोपींचा तपास लावण्यात जिल्हा गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना यश आले, असुन या मधील सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन आरोपी पोलिसांवर गोळीबार करुन फरार झाले आहेत त्यांच्या शोध चालु आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी या बाबत आज पत्रकार परिषद घेवुन पोलिसांच्या कामगिरीची माहीती दिली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहीते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती विभाग नारायण शिरगावकर, भोर विभाग धनंजय पाटील, जिल्हा गुन्हे शाखेच निरीक्षक पद्माकर घनवट, राजगडचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे उपस्थित होते.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार 

जिल्ह्यातील या तीन तालुक्यात मधील सुमारे चौदा गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. स्थानीक पोलिसांसह हे पथक समांतर तपास करत असताना 150 किलोमिटर अंतरा मधील सुमारे 200 सीसीटिव्ही कँमेरांची तपासणी या पथकाने केली होती. तसेच, गोपनीय बातमीदार व तांत्रीक बाजुने तपास करत असताना जेजुरी येथील अँमेझाँन स्टोअर्स मधील काही वस्तु चंद्रकात लक्ष्मण लोखंडे रा.ढवळ ता. फलटण, जि. सातारा व शाम शशीराज मुळे रा. निरा, ता. पुरंदर हे वापरत असल्याचे समजताच त्यांना मोटार सायकल व तीन मोबाईल सह 25 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन माहीती घेवुन गुन्हात सहभागी असलेले निलेश बाळासो निकाळजे रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, अक्षय़ विलास खोमणे, रा. कोरहाळे बु., ता. बारामती, राहुल पांडुरंग तांबे, रा. जेऊर, ता. पुरंदर,यांना 28 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले तर प्रविण प्रल्हाद राऊत रा. चिखली, ता. इंदापुर, पप्पु उर्फ सुहास सोनवलकर, रा. वडले, ता. फलटण, प्रमोद उर्फ आप्पा ज्ञानदेव माने, रा. तामशेतवाडी, ता. माळशीरस, जि. सोलापुर हे वडले ता. फलटण या ठिकाणी असल्याचे समजताच वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे स. पो. नि. सोमनाथ लांडे, फोजदार शिवाजी ननवरे व गुन्हे शाखा पथक हे त्यांना ताब्यात घेण्यास गेले असता, त्यांनी राऊत यास ताब्यात घेतले. परंतु, सोनवलकर व माने हे पोलिसांवर गोळीबार करुन पलायन केले त्यांच्यावर पोलिसांना जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांचा तपास पोलिस पथक घेत आहेत.

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट...अश्लील व्हिडिओ कॉल अन् पैशांची मागणी...

गुन्ह्यातील या आरोपींनी संघटीत गुन्हेगारांची टोळी तयार करुन त्याव्दारे या चौदा गुन्ह्यांसह गुरसाळे, जिल्हा सोलापुर, कळंबोली, नवी मुंबई याठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असुन, अजुन काही गुन्हे केल्याची शक्यता आहे त्या बाबत तपास करण्यात येत आहे.

या टोळीचा तपास लावल्या बद्द्ल जिल्हा पोलिस अधिक्षकांनी जिल्हा गुन्हे शाखा पोलिस पथकासह स्थानिक पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top