पुणे शहरातील वस्त्यांमध्ये ४१ टक्के घरे शौचालयाविनाच!

41 per cent of the houses in the slum aerain Pune city without toilets
41 per cent of the houses in the slum aerain Pune city without toilets

पुणे - पुणे शहरातील अडीचशे वस्त्यांमधील ४१ टक्के घरांमध्ये अद्यापही शौचालय नसल्याचे समोर आले आहे. त्यांना सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो. शेल्टर असोसिएट्‌सने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

‘घर तेथे शौचालय’ या उद्देशाने काम करणाऱ्या शेल्टर असोसिएट्‌स या संस्थेला २५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त संस्थेच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत असोसिएट्‌सच्या संचालिका प्रतिमा जोशी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेच्या वतीने पाच वर्षांपूर्वी शहरातील अडीचशे वस्त्यांमध्ये सर्व्हे करण्यात  आला होता. त्या वेळी केवळ २८ टक्के घरांमध्ये शौचालय होते. त्यानंतर संस्थेने पालिका आणि खासगी संस्थेच्या मदतीने जनजागृती केली. तसेच मोठ्या प्रमाणावर निधी पुरविण्याबरोबरच लोकसहभागातून ‘घर तेथे शौचालय’ ही मोहीम राबविली, असे जोशी म्हणाल्या.

छोटी घरे, ड्रेनेज लाइनची अपुरी सुविधा आदी कारणांमुळे शंभर टक्के घरांमध्ये हे शौचालय उभारणे शक्‍य झाले नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘शहरात सुमारे साडेचारशे वस्त्या आहेत. अद्यापही चाळीस ते पन्नास हजार शौचालय उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी निधीची आवश्‍यकता असून, स्वच्छ भारत योजनेंतर्गत, तसेच नगरसेवकांनी निधी उपलब्ध करून देण्यास  पुढाकार घ्यावा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com