बँक ऑफ महाराष्ट्रची 28 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

पुणे : नवीन सदनिका घ्यायची असल्याचे सांगून दांपत्याने बनावट कागदपत्रे सादर करून बँक ऑफ महाराष्ट्रची तब्बल 28 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार कोंढवा येथे घडला. 

या प्रकरणी नीता भोसले (वय 57, रा. सेनापती बापट रस्ता) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये ईश्‍वर गोविंद वाघमारे व त्याची पत्नी (रा. हंबीर बिल्डिंग, शिवचैतन्य कॉलनी, हडपसर) अशा दोघांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

भोसले या बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता येथील शाखेच्या व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे वाघमारे व त्यांची पत्नी हे दोघेही नवीन सदनिका घेण्यासाठी कर्ज मिळावे, यासाठी आले होते. त्यासाठी त्यांनी ते काम करत असलेल्या कंपनीची कागदपत्रे, पगाराची पावती, फार्म 16 अशी कागदपत्रे, वसुंधरा डेव्हलपर्सचे मागणी पत्र, पैसे भरल्याच्या पावत्या, ना हरकत प्रमाणपत्र अशी बनावट कागदपत्रे दिली.

या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र बँकेने लातूर अर्बन बँकेच्या लुल्लानगर येथील शाखेमध्ये वसुंधरा डेव्हलपर्सच्या नावाने 28 लाख रुपये दिले. ही रक्कम काढून दोघांनी बँकेची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर भोसले यांनी यासंदर्भात बँकेची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.

Web Title: Fraud Case against Pune Couple by Bank Of Maharashtra