Money Laundering : मनी लॉन्ड्रिंगच्या बहाण्याने डॉक्टरची फसवणूक

या प्रकरणी एका ६७ वर्षीय डॉक्टरने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Money Laundering
Money Launderingesakal

पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करण्यात येणार असल्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका डॉक्टरची ३० लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली.

Money Laundering
Latur News : लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैशाचा तुटवडा

या प्रकरणी एका ६७ वर्षीय डॉक्टरने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कर्वेनगर भागातील शाहू कॉलनी परिसरात वास्तव्यास आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाईलवर मुंबईहून प्रदीप शर्मा बोलत असल्याचे सांगितले. मनी लॉन्ड्रिंगच्या व्यवहारात सीबीआयकडून तुमची चौकशी करण्यात येत असल्याची धमकी दिली.

चोरट्यांनी डॉक्टरकडे आधारकार्ड, बँक खाते आणि रक्कम याबाबत माहिती मागितली. तसेच, बँक खात्याचा तपास करण्यासाठी ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना धमकावून वेळोवेळी ३० लाख ५७ हजार रुपये घेतले. सात फेब्रुवारी ते १४ एप्रिल या कालावधीत हा प्रकार घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com