आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह चार महिला आमदारांची फसवणूक

'मॅडम तुमच्या मतदार संघातुन बोलतोय, माझी आई आजारी आहे, तिच्यावर उपचार करण्यासाठी मदतीची गरज आहे' असे आवाहन करुन चोरट्याने महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
MLA  Madhuri Misal
MLA Madhuri Misalsakal
Summary

'मॅडम तुमच्या मतदार संघातुन बोलतोय, माझी आई आजारी आहे, तिच्यावर उपचार करण्यासाठी मदतीची गरज आहे' असे आवाहन करुन चोरट्याने महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

पुणे - 'मॅडम तुमच्या मतदार संघातुन बोलतोय, माझी आई आजारी आहे, तिच्यावर उपचार करण्यासाठी मदतीची गरज आहे' अशा पद्धतीने भावनिक आवाहन करुन एका सायबर चोरट्याने थेट महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह तीन महिला आमदारांनाही याच पद्धतीने पैसे मागितले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मिसाळ यांची मुलगी पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन मुकेश राठोड याच्यासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईल क्रमांकावर मुकेश राठोड या नावाच्या व्यक्तीन संपर्क साधला. "मॅडम मी आपल्या मतदार संघात राहणारा व्यक्ती आहे, माझी आई बाणेर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. तिच्या उपचारांसाठी मला पैशांची गरज आहे.'' अशी बतावणी करीत त्याने मिसाळ यांच्याशी संवाद साधला. आईवर उपचारांसाठी समोरील व्यक्ती फोन करुन भावनिक आवाहन करीत असल्यामुळे मिसाळ यांनीही त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर त्याने मिसाळ यांना ऑनलाईन माध्यमाद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तीन हजार सहाशे रुपये राठोड यास पाठविले.

दरम्यान, मिसाळ या अन्य आमदारांशी बोलत होत्या. त्यावेळी आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले यांचीही याच पद्धतीने आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती त्यांच्या चर्चेतुन पुढे आली. त्यानुसार, फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर राठोड व त्याच्या साथीदाराने चारही महिला आमदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, त्यांच्याविरुद्ध गुन्हा बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com