रवींद्र बऱ्हाटेवर आठवा गुन्हा दाखल; दमदाटी करत दिली जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे, विनोद गोकूळ ढोणे, सचिन श्रीरंग ढोणे, सुनील पांडुरंग खेडेकर, नंदा लालदास जोरी, राकेश लालदास जोरी, राजश्री दीपक चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांनी वानवडीतील एका व्यावसायिकाशी जमीन विक्रीचा व्यवहार करून त्याबदल्यात त्यांच्याकडून 18 लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात जमीन दुसऱ्यांना विकून व्यावसायिकास मात्र दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बऱ्हाटेसह सात जणांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बऱ्हाटे विरुद्ध दाखल झालेला या स्वरुपाचा हा आठवा गुन्हा आहे. 

रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे, विनोद गोकूळ ढोणे, सचिन श्रीरंग ढोणे, सुनील पांडुरंग खेडेकर, नंदा लालदास जोरी, राकेश लालदास जोरी, राजश्री दीपक चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उत्तम केदारी (वय 70, रा.केदारी रेसिडेन्सी, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मॅकडोनाल्डची फ्रॅन्चायझी देतो म्हणाले अन् साडे आठ लाख रुपयांना गंडवून गेले​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम केदारी हे व्यावसायिक आहेत. त्यांची पुरंदरमधील गराडे येथे जमीन आहे. त्यानिमित्त गावी येणे-जाणे होत असतानाच त्यांची विनोद ढोणे आणि सचिन ढोणे या दोघांशी ओळख झाली. त्यांनी त्यांची सात एकर जमीन विक्री करायची असल्याचे सांगितली. केदारी आणि त्यांच्या बंधूंनी ही जमीन पसंत पडल्यानंतर त्यांच्यात एक कोटी 54 लाख रुपयांना संबंधित जमीन खरेदी करण्याचे निश्‍चित झाले.

त्यावेळी सुनील खेडेकर, रवींद्र बऱ्हाटे, मयत लाला जोरी यांच्यातर्फे कायदेशीर वारस म्हणून नंदा जोरी, राकेश जोरी व रितेश जोरी अशा तिघांशी त्यांचा मिळकतीचा करारनामा केल्याचे ढोणे बंधूंनी फिर्यादी सांगितले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या तीन भावांनी त्यांना 10 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले, काही दिवसांनी ढोणे बंधूंनी त्यांच्या घरात लग्नकार्य असल्यामुळे आणखी पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा पुन्हा आठ लाख रुपयांचा धनादेश देत एकूण 18 लाख रुपये दिले.

'खबरदार! जर 'पीयूसी'साठी जादा दर आकाराल तर'; आरटीओने दिला कडक इशारा

दरम्यान, फिर्यादी यांनी ढोणेकडे व्यवहार पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. डिसेंबर 2018 मध्ये जमीन असलेल्या ठिकाणी गेले, तेव्हा त्यांना ही जमीन अन्य लोकांना फिर्यादीच्या परस्पर विक्री केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्याकडे 18 लाखांची मागणी केली, तेव्हा दमदाटी करीत पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of Rs 18 lakh from Ravindra Barhate and his associates