esakal | परदेशात नोकरीच्या आमिषाने पावणेपाच लाखाची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक

मंचर : परदेशात नोकरीच्या आमिषाने पावणेपाच लाखाची फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंचर : ‘परदेशात नोकरीला लावतो’ असा विश्वास संपादन करून लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे राहणाऱ्या किरण सूर्यकांत ढेरंगे (वय २९) या तरुणाची एकूण चार लाख ७७ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात वेमुल शंकर प्रसाद (वय ४५, रा. सहारगाव, अंधेरी, मुंबई) व आश्विन कुमार (रा. पंजाब) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरीकांची गर्दी

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ढेरंगे हा नोकरीच्या शोधात होता. त्याची मुंबई येथे वेमुल प्रसाद यांच्या बरोबर ओळख झाली. प्रसाद यांनी परदेशात नोकरीला लावतो, असे सांगितले. त्यांनी परदेशात जाण्यासाठी नोकरीचे प्रोसेस कागदपत्रांसाठी व इतर खर्चासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे त्यांचा भागीदार आश्विन कुमार यांच्या बँक खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानुसार रोख व वेळोवेळी स्वतः, मित्र व नातेवाइकांनी बँक खात्यावर चार लाख ७७ हजार ५०० रुपये रक्कम जमा केली.

हेही वाचा: शाळाविना असलेल्या शिक्षकांना समुपदेशनाने देणार नियुक्त्या

‘तुमचे काम एक महिन्यामध्ये होऊन जाईल. तसेच, उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. पण, तीन वर्ष पाठपुरावा करूनही नोकरीचे काम झाले नाही. पैसे परत मिळाले नाही. प्रसाद यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी मोबाईल बंद ठेवलेला आहे. गुरुवारी (ता. ९) रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक लहू थाटे करत आहेत.

loading image
go to top