लॉकडाऊनच्या काळात फेक फेसबुक अकांऊटवरुन महिलेला मेसेज आला अन....

Fraud of Rs 75000 for claiming lottery during Lockdown
Fraud of Rs 75000 for claiming lottery during Lockdown
Updated on

पुणे : लॉकडाउन काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. लॉटरी लागण्याचे सांगत एका महिलेला 75 हजार रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघड झाला आहे.  याबाबत कल्याणीनगर येथे राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फेसबुकवर बनावट खाते असलेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.27 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिलेल्या माहितीनुसार, ''आरोपीने फिर्यादी यांच्या एका सहकार्‍याच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले. त्याआधारे फिर्यादी यांना मेसेंजरवर मेसेज करून लॉटरी लागण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर लॉटरीचे पैसे मिळण्यासाठी कुरिअर चार्जेस म्हणून 74 हजार 672 रुपये फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन उकळले.

आणखी वाचा - पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com