पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची फसवणूक

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

जुन्नर : पैसे मोजून देतो, असे सांगून अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ महिलेची 11 हजार रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार कुसूम धर्माजी तळपे, (वय 65 रा.घाटघर, ता.जुन्नर) यांनी जुन्नर पोलिसांकडे दिली आहे. कुसूम तळपे या काल (गुरुवार) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्नर येथील शाखेत डॉ.अब्दुल कलाम अमृत योजनेचे जमा झालेले अनुदान काढण्यासाठी आल्या असता हा प्रकार घडला. 

याबाबत कुसूम तळपे यांनी सांगितले, की बँक खात्यातील 21 हजार रुपये काढून त्या पैसे मोजत असताना एक अनोळखी इसम आला व आजी मी तुम्हाला पैसे मोजून देतो असे म्हणल्याने माझेकडील पैसे मोजण्यासाठी त्याला दिले. माझ्याकडे पैसे परत देत तुमचे 21 हजार रुपये बरोबर आहेत, असे सांगून निघून गेला. यानंतर ही रक्कम मी माझ्या खात्यात जमा करण्यासाठी बँकेत थांबले. 21 हजारात दोन हजार रुपये काढून उरलेल्या 19 हजार रुपयांची भरणा स्लिप व पैसे कॅशियरकडे दिले असता त्यांनी आजी तुम्ही फक्त आठ हजार रुपये दिलेत व भरणा स्लिप १९ हजारांची असल्याचे सांगितले. सदरची रक्कम त्यांनी माझ्याकडे परत दिली ती मोजली असता ८ हजार रुपये असल्याचे दिसले. त्यावेळी अनोळखी इसमाने मला पैसे मोजून देण्याचे बहाणा करून सदर रकमेतील 11 हजार स्वत:कडे ठेऊन माझी फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

पोलिस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी बँक व ग्राहकांसाठी केलेल्या आवाहनात अनोळखी व्यक्तीस पैसे मोजणेस देऊ नये. तसेच बँकेने ग्राहक नसलेले व्यक्तीस प्रवेश देऊ नये. ‌बँकेत आलेले प्रत्येक व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट येईल अशा ठिकाणी कॅमेरा बसविण्यात यावा असे नमूद केले आहे.

Web Title: Fraud with senior lady in Junnar