Wanwadi : महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक

ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Cyber crime
Cyber crimesakal

Pune : ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेस मोबाईलवर संपर्क साधला. ऑनलाइन पोर्टलवर जाहिरातींना दर्शकांची पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले.

त्यानुसार महिलेने ऑनलाइन काम केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाइन टास्क व्यवसायात जादा रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले.

चोरट्यांनी महिलेकडून मागील सहा महिन्यांत ११ लाख १३ हजार रुपये खात्यात भरण्यास भाग पाडले. परंतु महिलेला परतावा दिला नाही. याबाबत महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com