शेकडो लिटर दुधाचे शेतकऱ्यांकडून मोफत वाटप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - राज्य सरकारने जाहीर केलेला प्रतिलिटर 27 रुपये दर मिळत नसल्यामुळे संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी शेकडो लिटर दुधाचे मोफत वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांकडून दूध कमी दराने खरेदी करून ग्राहकांना तिप्पट दराने विकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

राज्य सरकारचे दूध संस्थांवर अजिबात नियंत्रण राहिलेले नाही. शेतकऱ्यांकडून दूध कमी दराने खरेदी करून, ते ग्राहकांना तिपटीने विकले जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केला. दुधापासून अन्य पदार्थ तयार करूनही दुधाचा "एसएनएफ' तोच कसा राहतो, यातील गौडबंगाल बाहेर आले पाहिजे. शहरात दूध कोणत्या प्रतीचे आहे, हे तपासण्याची सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. काही दूध संघांकडून हा गोरखधंदा सुरू असून, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, भारतीय किसान सभेचे प्रदेश समन्वयक अजित नवले, शेतकरी संघटनेचे जी. डी. इनामदार, बी. आर. पाटील, नंदा जाधव, किसान सभेचे ऍड. नाथा शिंगाडे, प्रहार अपंग संघटनेचे रामदास खोत, धर्मेंद्र सातव, अमोल वाघमारे, नवनाथ गव्हाणे, रोहिदास काळे, बाळासाहेब काळे, भरत काळे आदी सहभागी झाले होते. 

Web Title: Free allocation of hundreds of liter milk from farmers