Aarogya Wari : आरोग्य वारीद्वारे बारा लाख वारकऱ्यांची मोफत तपासणी

राज्याचा आरोग्य विभाग आणि पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाच्यावतीने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त खास वारकऱ्यांसाठी आयोजित 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रम.
Warkari health Checkup
Warkari health Checkupsakal

पुणे - राज्याचा आरोग्य विभाग आणि पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाच्यावतीने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त खास वारकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या उपक्रमांतर्गत आरोग्य वारीत ११ लाखांहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.

तपासणी करण्यात आलेल्या एकूण वारकऱ्यांपैकी पालखी मार्गावर तपासणी करण्यात आलेल्या ६ लाख ६४ हजार ६०७ तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५ लाख ७७ हजार अशा एकूण १२ लाख ४१ हजार ६०७ वारकऱ्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार यंदा देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी २७ ते २९ जून २०२३ या कालावधीत वाखरी, गोपाळपूर व ३ रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय विठ्ठल मंदिर परिसरामध्ये, वाळवंट ठिकाणी तीन आणि ६५ एकर येथे एक 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून १० खाटांची (बेड) सोय असलेल्या अतिदक्षता विभागासह वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. पंढरपूर शहरामध्ये १७ ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता.४) सांगितले.

या उपक्रमांतर्गत प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर 'आपला दवाखाना' उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. यासाठी १९४ रुग्णवाहिका या चोवीस तास तर, ७५ रुग्णवाहिका या अत्यावश्‍यक रुग्ण सेवांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांमुळे १९ हजार ८५३ वारकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देता आल्या. यामुळे वारीतील ८४७ अत्यावश्यक वारकऱ्यांना योग्य वेळी उपचार मिळाल्याने, त्यांचे प्राण वाचविता आले.

पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा

- पुणे परिमंडळ व पुणे जिल्हा परिषदेतर्फे ९ आरोग्य पथके

- बाईक ॲम्बुलन्स आणि १२४ आरोग्यदूत

- दिंडी प्रमुखांना ३ हजार ५०० औषधी किटचे मोफत वाटप

- पालखी मार्गावरील ७ हजार ४६० हॉटेल्समधील १० हजार ४५० कामगारांची आरोग्य तपासणी

- पालखी मार्गावर १५६ टँकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा

- पालखी व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, पाण्याच्या सर्व स्त्रोतांची चाचणी

- आरोग्य संस्थांमार्फत जैव कचऱ्याची विल्हेवाट

- महाशिबिरातून वारकऱ्यांच्या ४० प्रकारच्या प्रयोगशाळास्तरीय तपासण्या

- प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल वारकऱ्यांना मोबाइलद्वारे पाठविला

- मोफत नेत्र तपासणी करून ७७ हजार ८५४ चष्मे वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com