वाई:प्रतिकुल प्रतिष्ठान व दलीत विकास आघाडीच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ३० रूग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया.

वाई:प्रतिकुल प्रतिष्ठान व दलीत विकास आघाडीच्यावतीने    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ३० रूग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया.
Published on

वाईमध्ये ३० रुग्णांवर
मोफत नेत्र शस्त्रक्रिया

वाई : येथील प्रतिकूल प्रतिष्ठान व दलित विकास आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी गरजू रुग्णांसाठी आयोजित मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ. विठ्ठल भोईटे, संस्थापक संजय सकटे यांचे पुढाकारातून ग्रामीण रुग्णालयाच्या सहकाऱ्याने सांगली येथे ३० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. डॉ. भोईटे यांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी, मधुमेह, रक्तदाब व इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांचा निवड केली. प्रवास, जेवण आणि परतीची वाहन व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली. उपक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौरभ निंबाळकर, कर्मचारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण संकपाळ, दिलीप कांबळे, शिवाजी भिसे, राजू तावरे, सोमनाथ आवळे, आरती कांबळे, कुणाल सकटे, दिलीप जाधव यांनी सहकार्य केले.

----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com