Coronavirus : डॉक्टर दवाखाने बंद करत असताना रुग्णांवर मोफत औषधोपचार

डॉ. संदेश शहा
Monday, 27 April 2020

कोरोना विषाणूजन्य आजाराच्या भितीने अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले असल्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथील चार डॉक्टरांनी मात्र आपल्या दवाखान्यात ८१ रुग्णांवर मोफत औषधोपचार केले.

इंदापूर (पुणे) : कोरोना विषाणूजन्य आजाराच्या भितीने अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले असल्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथील चार डॉक्टरांनी मात्र आपल्या दवाखान्यात ८१ रुग्णांवर मोफत औषधोपचार केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर प्रभाग क्रमांक १चे नगरसेवक अनिकेत वाघ यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सलग ८ दिवस डॉक्टरांनी राबविला. सर्व रुग्णांना राधिका सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघ, नगरसेवक अनिकेत वाघ यांच्यावतीने मोफत औषधे देण्यात आली. व्यंकटेशनगर येथील ओम हॉस्पिटलचे डॉ. उदय फडतरे, ओंकार हॉस्पिटलचे डॉ. मनोज शिंदे, कालठण रोड येथिल इरा क्लिनिकचे डॉ. अमित मारकड व डॉ. निलेश लोंढे यांनी हातावर पोट असणारे गरजू नागरिक, कामगार यांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले.

दक्षिण कोरियाकडून किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा

या प्रभागात आतापर्यंत ७०० नागरिकांना मास्क वाटप केले. असून तीनवेळा प्रभागाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले आहे. ११० बाटल्या रक्तसंकलन केले आहे. ना नफा ना तोटा तत्वावर प्रभागात फळे, भाजी पुरवली आहे तर ५० गरजूंना जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free medication to patients while doctors close clinics In Corona Crisis