दक्षिण कोरियाकडून किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा

वृत्तसंस्था
Monday, 27 April 2020

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत काही दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते. जगाच्या मीडियाचे लक्ष किम जोंग उन यांच्याकडे लागून होते. अशात दक्षिण कोरियाकडून त्यांच्या प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

हाँगकाँग : उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत काही दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते. जगाच्या मीडियाचे लक्ष किम जोंग उन यांच्याकडे लागून होते. अशात दक्षिण कोरियाकडून त्यांच्या प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किम जोंग उन यांची प्रकृत्ती उत्तम आहे आणि ते जिवंत आहेत. ते १३ एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत, अशी माहिती दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी सीएनएनशी बोलताना दिली. काही दिवसांपूर्वी उन यांची प्रकती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, आता दक्षिण कोरियानं दिलेल्या माहितीनंतर त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Cornavirus : पुण्यात कोणत्या क्षेत्रिय कार्यालयात किती रुग्ण? तुमच्या भागात किती आहेत रुग्ण?

दरम्यान, उत्तर कोरियाचं संस्थापक आणि किम जोंग उन यांचे आजोबा यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आलं होतं. १५ एप्रिलचा दिवस हा उत्तर कोरियाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. २०११ मध्ये आपल्या वडिलांच्या हातून सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत या दिवशी होणारा कार्यक्रम कधीही चुकवला नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Korea Confident That Rumors of Kim Jong-un Illness Are Wrong