"सी-डॅक'कडून प्रणाली विकसित ; रहदारीतही रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा 

pune.jpg
pune.jpg

पुणे : रस्त्यावरून जाताना अचानकपणे एखादी रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाचे वाहन वाहतूक कोंडीत अडकले, तर त्या वाहनाला आता क्षणार्धात मार्ग मोकळा करून देणारी यंत्रणा विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सिग्नल यंत्रणेत आवश्‍यक ते बदल होऊन, त्या वाहनाला पुढे जाण्याचा मार्ग "सी-डॅक'ने विकसित केलेल्या "आपत्कालीन सेवा वाहन प्राधान्य प्रणाली'द्वारे मोकळा होऊ शकणार आहे. 

आपत्कालीन परिस्थिती सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने अनेकदा रस्त्यावरील रहदारीमुळे अडकतात. परिणामी, वेळेत घटनास्थळी पोचू न शकल्यामुळे जीवितहानी होऊ शकते. हे हानी टाळण्यासाठी लाल सिग्नल किंवा रहदारी असलेल्या रस्त्यावरून या वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळावा म्हणून ही प्रणाली आहे. यात आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनाच्या दिशेला हिरवा कंदील दिला जाईल. 

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगचा (सी-डॅक) 32 वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आपत्कालीन सेवा वाहन प्राधान्य प्रणाली (इमर्जन्सी सर्व्हिस व्हेईकल प्रायोरिटी सिस्टीम) यासह मिडास, सी-चक्षू, श्रुतलेखन आणि जिस्ट-मेल या पाच प्रणालींचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी, डॉ. देवानंद शिंदे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, "सी-डॅक'चे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी उपस्थित होते. 

या वेळी डॉ. दरबारी म्हणाले, "सध्या देश डिजिटल परिवर्तनाच्या क्रांतिकारक टप्प्यातून जात आहे. उपलब्ध सेवांच्या सुधारणेमुळे अनेक बदल होत आहेत. डिजिटल क्षेत्रातील प्रगतीमुळे नागरिकांना सरकारशी संवाद साधणे अधिक सोईस्कर होत आहे.'' 

श्रुतलेखन प्रणाली 

"सी-डॅक'ने विकसित केलेली "श्रुतलेखन' ही प्रणाली भाषण तंत्रज्ञानावर आधारित असून, मानवी आवाज ओळखण्याची क्षमता त्यात आहे. हिंदी आणि मराठी भाषेसाठीदेखील ही प्रणाली उपलब्ध आहे. संबंधित संभाषण मजकूर स्वरूपात दिसणार आहे, तर "जिस्ट-मेल' ही प्रणाली "आपल्या भाषेत आपला ई-मेल' धर्तीवर विकसित करण्यात आली आहे. जिस्ट-मेल असलेले कोणीही त्यांचे ई-मेल आयडी त्यांच्या भाषेत ठेवू शकणार आहेत, अशी माहिती "सी-डॅक'च्या वतीने देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com