विद्यार्थ्यांनो, 'मॉक'टेस्ट ऑनलाईन द्या तेही फ्री

Free practice facility available online for college students through MKCL
Free practice facility available online for college students through MKCL
Updated on

पुणे : तुमची महाविद्यालयीन परीक्षा येत्या काही दिवसांत ऑनलाइनद्वारे होणार आहे का?, आणि काय तुम्हाला ऑनलाइन परीक्षेचा सराव नसल्याने 'टेन्शन' आले आहे. अहो, मग जरा इकडे लक्ष द्या!! महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमकेसीएलने विद्यापीठाच्या अभिरूप (मॉक) ऑनलाईन परीक्षेची विनामूल्य सराव सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना महामारीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरुपात संगणक किंवा स्मार्टफोनवर ऑनलाईन पद्धतीने घरच्या घरी घेण्याचे धोरण सर्वसाधारणपणे निश्चित झाले आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्मार्टफोनवरील ऑनलाईन परीक्षांचा व बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्न त्यावर सोडविण्याचा पूर्वानुभव नाही. त्यामुळे ते परीक्षेतील गुण आणि यश याबाबत साहजिकच चिंतित आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विनामूल्य 'अभिरूप (मॉक) ऑनलाईन सराव परीक्षे'ची परीक्षेची सुविधा "mockexams.mkcl.org" या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे गेल्या तीन दिवसात राज्यातील २६,००० विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. इच्छुक विद्यार्थी संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे या संकेतस्थळावर आपली माहिती देऊन नोंदणी करू शकतात व त्याद्वारे मिळालेल्या लॉगीन व पासवर्डचा वापर करून कितीही वेळा ऑनलाईन परीक्षेचा सराव करू शकतात. ही विनामूल्य सराव सुविधा ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत उपलब्ध असेल, अशी माहिती एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर उदय पंचपोर यांनी दिली आहे.

सध्या या संकेतस्थळावर विद्यापीठनिहाय पदवी अभ्यासक्रमातील विषयांसंबधित चाचण्या ठेवण्यात आलेल्या नसून आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण व निर्णयक्षमता तसेच भाषिक व तार्किक कौशल्ये तपासणाऱ्या सर्वसाधारण क्षमता-चाचण्या उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व विद्यापीठांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा कशी असते हे त्यावरून सहज समजेल, ती सोडविण्याचा उत्तम सराव करता येईल व त्यासंबंधीच्या काल्पनिक चिंता व भीती दूर होतील. विद्यार्थ्यांच्या संगणक किंवा स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याचा विशिष्ट पद्धतीने उपयोग करून परीक्षेदरम्यान विद्यापीठाकडून पर्यवेक्षण कसे केले जाऊ शकते, याचीही सवय होईल, असे पंचपोर यांनी सांगतिले.

कोरोनामुक्त रुग्णांना उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा; शहरात सुरू होणार 'पोस्ट कोविड ओपीडी' सेंटर!

"विद्यापीठांचे विषयनिहाय सराव प्रश्नसंच सार्वजनिक आखत्यारीत (पब्लिक डोमेनमध्ये) पुनर्वितरणासाठी उपलब्ध झाल्यास ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल व विद्यार्थ्यांना त्यांचाही सराव करता येईल. या संकेतस्थळावर परीक्षेसाठी केवळ सराव सुविधा उपलब्ध असून कोणत्याही विद्यापीठाची औपचारिक अंतिम परीक्षा घेतली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी."
- उदय पंचपोर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, पण केंद्राची भूमिकाही महत्त्वाची : शरद पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Government Begins Survey of Pre 2011 Government Land Encroachments in Mumbai and Pune for Regularisation
Malin Village Landslide Anniversary 12 Years Since 151 Lives Were Lost in Devastating Pune District Disaster
narayangaon police arrested baliram jalindar tambe beed accused for stealing farmer tractor from pargaon tarfe ale junnar cctv investigation
malthan shirur pune family assault after children dispute sc st atrocity act case prem bhaskar sonawane santosh gurav sachin gurav ravindra bhosale shirur police
Marathi News Esakal
www.esakal.com