स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस पालिका रुग्णालयांत मोफत

स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस पालिका रुग्णालयांत मोफत

पुणे : ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे असल्यास तातडीने डॉक्‍टरांकडे जा. ही सामान्य फ्लूप्रमाणेच स्वाइन फ्लूचीही लक्षणे असल्याने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे; तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, गर्भवती अशा जोखमीच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस उपलब्ध केल्याची माहिती देण्यात आली. 

रेंगाळलेल्या थंडीपाठोपाठ दिवसा उन्हाचा वाढलेला चटका आणि रात्री हवेतील गारठा अशा वातावरणामुळे स्वाइन फ्लूच्या अत्यवस्थ रुग्णांची संख्या पुण्यात वाढली आहे. शहरात दीड महिन्यात 49 रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असून, त्यापैकी 19 जणांवर यशस्वी उपचार करण्यात असून, 17 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 

याबाबत सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, ""वातावरणातील विषमतेमुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लू होण्याची शक्‍यता असल्याने या रुग्णांना स्वाइन फ्लूचे औषध सुरू करावे, अशा सूचना खासगी डॉक्‍टरांनाही दिल्या आहेत.'' 

महापालिकेच्या रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या औषधांचा पुरेसा साठा आहे. तसेच, जोखमीच्या रुग्णांना प्रतिबंधक लसही मोफत उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील स्वाइन फ्लूच्या उद्रेकाचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. 

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, पुणे महापालिका 

पुण्यातील स्वाइन फ्लूबाबतची माहिती 

- तपासलेले रुग्ण ........ 10 लाख ........ 1 लाख 34 हजार 
- औषध दिलेले रुग्ण .... 17,500 ........ 1742 
- "पॉझिटिव्ह' रुग्ण ....... 592 ............. 49 
- मृत्यू .................... 138 ............ 7 
- पुण्यातील मृत रुग्ण ..... 60 .............. 4 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com