esakal | खासगी-सरकारी भेदभाव न करता कोरोना चाचणी करा; शिक्षण संस्थाचालकांच्या विविध मागण्या
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_School_Teachers

शासनाने आणि महापालिकेने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करताना खासगी शाळांचा विचार केला नाही. त्यांच्या अटी लगेच पूर्ण करणे आम्हाला शक्‍य नाही. त्यामुळे अनेक शाळा सोमवारपासून सुरू होऊ शकणार नाहीत.

खासगी-सरकारी भेदभाव न करता कोरोना चाचणी करा; शिक्षण संस्थाचालकांच्या विविध मागण्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य शासनाने शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. शासकीय शाळांप्रमाणे खासगी शाळेतही मोफत चाचणी करावी, त्यांच्यात भेदभाव करू नये अशी मागणी इंडिपेंटेंड इंग्लिश स्कूल्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजेंद्र सिंह यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत संस्थाचालकांची बाजू मांडली.

सात महिन्यानंतर सुरू होणार शाळा; नववी ते बारावीचे वर्ग भरणार!​

शासनाने आणि महापालिकेने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करताना खासगी शाळांचा विचार केला नाही. त्यांच्या अटी लगेच पूर्ण करणे आम्हाला शक्‍य नाही. त्यामुळे अनेक शाळा सोमवारपासून सुरू होऊ शकणार नाहीत. त्यासाठी किमान आणखी एका आठवड्याचा कालावधी आवश्‍यक आहे. तसेच शासनाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत, पण खासगी शाळांची आणि त्यातील कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही, त्यामुळे खासगी आणि सरकारी असा भेदभाव न करता सर्वांची आरटीपीसीआर चाचणी मोफत करावी, शाळांवरील बोजा लक्षात घेता तसेच सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण एकसमान दर्जाचे व्हावे, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निर्जंतुकीकरण करून द्यावे, अशी मागणी सिंह केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image