esakal | सात महिन्यानंतर सुरू होणार शाळा; नववी ते बारावीचे वर्ग भरणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Students_School

कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण 9 मार्च 2020 ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर 16 मार्चपासून टप्याटप्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

सात महिन्यानंतर सुरू होणार शाळा; नववी ते बारावीचे वर्ग भरणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुमारे सव्वासात महिन्यांच्या खंडानंतर येत्या सोमवारपासून (ता.23) नियमितपणे सुरू होणार आहेत. यामध्ये नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. येत्या सोमवारपासून टप्याटप्याने या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच्या सर्व माध्यमिक शाळा सोमवारपासून न भरता काही मंगळवार, तर काही येत्या बुधवारपासून सुरू होतील, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले.

Success Story: केळीनेच मारले अन् तारलेही; इराणला निर्यात होतेय लासुर्णेच्या शेतकऱ्याची केळी!​

कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण 9 मार्च 2020 ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर 16 मार्चपासून टप्याटप्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यातच 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने तेव्हापासून सर्व शाळा बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा या गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षातील अखेरचे दोन महिने आणि चालू शैक्षणिक वर्षातील सव्वापाच महिन्यांपासून शाळा बंद आहेत.

शास्त्रज्ञ म्हणताहेत, 'पुण्यात कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्‍य!'​

चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून आजतागायत ऑनलाइन शाळा सुरू आहेत. यामुळे प्रथम सत्र परीक्षासुद्धा ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर 23 नोव्हेंबरपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार सोमवारपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत.

Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!​

दरम्यान, शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. गणपत मोरे यांनी शनिवारी जिल्ह्यातील सुमारे साडेपाचशे मुख्याध्यापकांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शाळा सुरू करताना घ्यावयाची काळजी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी आणि शाळा सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.

माध्यमिक शाळा संक्षिप्त माहिती :- 

- ग्रामीण भागातील शाळांची संख्या - 1250
- अकरावी, बारावी वर्ग असलेल्या शाळा - 68.
- कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या - 306
- ग्रामीण भागातील माध्यमिक विद्यार्थी - सुमारे तीन लाख

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)