वर्दळीच्या ११ रस्त्यांवर दुचाकींसाठी ‘फ्री वे’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

वाहतुकीचा वेग वाढविण्यासोबतच ती सुरक्षित व्हावी, यासाठी वाहनांची वर्दळ असलेले ११ रस्ते दुचाकींसाठी एक्‍स्प्रेस (फ्री वे) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या रस्त्यांलगतची पार्किंग व्यवस्था, अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे.

पुणे - वाहतुकीचा वेग वाढविण्यासोबतच ती सुरक्षित व्हावी, यासाठी वाहनांची वर्दळ असलेले ११ रस्ते दुचाकींसाठी एक्‍स्प्रेस (फ्री वे) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या रस्त्यांलगतची पार्किंग व्यवस्था, अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील रस्त्यांवर विविध स्वरूपाची विशेषत: खासगी आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने येत असल्याने वाहतूक खोळंबत असल्याचे चित्र आहे. त्याशिवाय, दुचाकींमुळेही वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. 

प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोलमडल्याचा परिणाम जोड आणि अंतर्गत रस्त्यांवरही होऊन पादचारी-वाहनचालकांचे हाल होतात. त्यामुळे काही रस्ते दुचाकींसाठी मोकळे राहिल्यास वाहतुकीचा वेग वाढण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे विविध रस्‍त्यांवर टू- व्हिलरसाठी फ्री वे असेल. त्याच्या अंमलबजावणीची तयारी करीत, रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटवणे, दुचाकी-चारचारकींसाठीच्या पार्किंग व्यवस्थेत बदल करणे, छोट्या-मोठ्या दुकानदारांनी ग्राहकांच्या सोयीसाठी निर्माण केलेले पर्याय काढणे आदी बाबी हाती घेण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Way for two-wheelers On a crowded road

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: