रेल्वेच्या 51 स्थानकावर फ्री वाय-फाय

Free Wi-Fi at 51 stations of Railway in Pune
Free Wi-Fi at 51 stations of Railway in Pune

पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील 51 रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी "फ्री वाय-फाय' सेवा सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना स्थानकावर मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागातील काही रेल्वे स्थानकावर यापूर्वीच ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आता आणखी 51 रेल्वे स्थानकांवर नव्याने ही सेवा सुरू करण्यात येत असून, उर्वरित स्थानकांवर लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

ही सेवा सुरू झालेली स्थानके ः पुणे, उरुळी, हडपसर, लोणी, यवत, केडगाव, पाटस, सासवड रोड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबले, दौंड, वाल्हा, सालपा, अदरकी, जरंडेश्‍वर रहिमतपूर, तारगाव, मसूर, शिरवडे, शेणोली, भवानीनगर, ताकारी, किर्लोस्करवाडी, नांद्रे, जयसिंगपूर, रुकडी, कोल्हापूर, वळीवडे, हातकणंगले, मिरज, सांगली, भिलवडी, कराड, कोरेगाव, सातारा, पळशी, वाठार, नीरा, लोणंद, जेजुरी, राजेवाडी.

पुढील काही दिवसामध्ये चिंचवड, वडगाव, कामशेत, तळेगाव, घोरावाडी, बेगडेवाडी या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com