esakal | मित्रा हात जोडतो, परत जा; पोलिसांची पर्यटकांना विनंती
sakal

बोलून बातमी शोधा

dam

मित्रा हात जोडतो, परत जा; पोलिसांची पर्यटकांना विनंती

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: "येथे कलम 144 लावण्यात आले आहे. थांबण्यास, गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आपणास माहिती नसेल असं समजून मी तुम्हाला आत्ता पुन्हा हात जोडून सांगतो की आपण आलात तसे परत वळून जा. तुमच्यावर गुन्हा दाखल करुन आणि दंड वसूल करुन आम्हाला कसलंही समाधान मिळत नाही," असं अगदी काकुळतीला येऊन पुणे-पानशेत (Pune panshet) रस्त्यावरील खडकवासला धरण (khadakwasla Dam) चौपाटीवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी एक पोलीस हवालदार पर्यटकांना सांगत आहे. रामदास धनसिंग बाबर असं या पोलीस हवालदाराचं नाव असून ते सध्या हवेली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. (friend go back police request tourists)

नागरिकांची सुरक्षितता व कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेऊन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh deshmukh) यांनी दि. 16 जुलै 2021 रोजी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, गडकिल्ले, धरणं, धबधबे अशा ठिकाणांपासून एक किलोमीटरच्या परिसरात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकवासला धरण (khadakwasla Dam), डोणजे, घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला या चार ठिकाणी हा आदेश लागू आहे.

हेही वाचा: डिजीटल वारीतून साकारले पांडुरंगाचे निराकार रूप

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलिसांनी खडकवासला धरण चौपाटीवर नाकाबंदी केली आहे. सकाळपासून खडकवासला परिसरात रिमझिम पाऊस सुरू असून भर पावसात पोलीसांकडून याठिकाणी येणाऱ्या वाहनांना थांबवून विचारपूस करण्यात येत आहे. येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने व नागरिक ऐकत नसल्याने पोलीस अक्षरशः हात जोडून विनंती करत पुन्हा माघारी जाण्यास सांगत आहेत.

याबाबत बोलताना हवेली पोलीस ठाण्याचे हवलदार रामदास धनसिंग बाबर म्हणाले, "खुप पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तरीही लोकांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. आम्ही सर्वजण सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत लोकांना थांबवून परत पाठवत आहोत. गुन्हे दाखल करुन, दंड करुन लोक ऐकत नाहीत. आता हात जोडून विनंती करत आहे. पोलीसही माणूस आहे याची जाणीव पर्यटकांना होईल व त्यांच्यात सुधारणा होईल."

loading image