पाच हजार रुपयांसाठी मित्राचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे - उसने दिलेले पाच हजार रुपये वारंवार मागूनही परत देत नसल्याचा राग आल्याने एकाने आपल्या मित्राचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना रविवारी पहाटे दोन वाजता कोंढवा खुर्द येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकास अटक केली. 

जुबेर युनूस सय्यद (वय 22, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शेहबाज शाकीर शेख (वय 20, रा. भागोदयनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फैयाज तहेनूर शेख (वय 24, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर, शेहबाज, फैयाज, व सोहेल शेख हे चौघेही मित्र आहेत. जुबेर यास पैशांची गरज असल्याने त्याने शेहबाज याच्याकडून काही दिवसांपूर्वी पाच हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, जुबेरला दिलेल्या मुदतीत पैसे परत करता आले नाहीत, त्यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी बोलणे सोडून दिले. दरम्यान, शनिवारी रात्री साडेदहा वाजता शेहबाज याने जुबेरला फोन करून रामटेकडी येथील रेल्वे फाटकाजवळ बोलाविले. दोघांची चर्चा झाली. त्यानंतर शेहबाज याने जुबेर यास घरी सोडण्यास सांगितले. 

दरम्यान, शेहबाजने पुन्हा एकदा जुबेरकडे पैशांची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या शेहबाजने घरातून कोयता आणून जुबेरच्या डोक्‍यात वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची खबर मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद पाटील, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर पळून गेलेल्या शेहबाज यास पहाटे अटक केली. 

Web Title: Friend murder for five thousand rupees

टॅग्स