Video: निवारा केंद्रात परप्रांतीय बहुभाषिकाची जमली गट्टी...

Video: निवारा केंद्रात परप्रांतीय बहुभाषिकाची जमली गट्टी...

पिंपरी - महापालिकेच्या निवारा केंद्रात मध्य प्रदेश,  उत्तराखन्ड, कर्नाटक, आसाम,  झारखंड अशा बहुभाषिक नागरिकांचा दररोज गप्पांचा फड रंगत आहे. आतापर्यंत उघड्यावर अथवा झोपडीत आयुष्य काढले. इथे गाद्या आणि पंख्याखाली आराम करतोय, तरीही घराची आठवण येतेय, असे म्हणत या निवारा केंद्रातील परप्रांतीय नागरीकांनी आपल्या भावनांना  मोकळी वाट करून दिली. एका समस्येमुळे एकत्रित आलेल्या 88 नागरिकांमध्ये घराकडे जाण्याची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाउनमुळे 29 मार्चपासून  या नागरिकांना महापालिकेच्या आकुर्डीतील उर्दू शाळेत तयार करण्यात  आलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. या केंद्रात तब्ब्ल 30 दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील  नाशिक, कोल्हापूर, उस्मानाबाद, अमरावती, पंढरपूर याबरोबरच उत्तर भारतीय, मध्य प्रदेश, उत्तराखन्ड, कर्नाटक, आसाम,  झारखंड अशा इतर राज्यातील बहुभाषिक नागरिक एकत्र राहत आहेत. त्यांचे पूर्वीचे जीवन व आताचे जगणे पूर्णपणे बदलले आहे. कामाऐवजी आरामच आराम असल्याचे काही मजुरांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आवारात तान्हुलंबाळ 
या केंद्राची पाहणी केली असता, वेगळेच चित्र पहावयास मिळाले. या  केंद्रात रेखा गोसावी या महिलेचे दीड वर्षाचं  तान्हुलं आवारात धावताना दिसतं तर काही माता-भगिनी सामाजिक अंतर राखून घरी जाण्याच्या चिंतेत बोलत असल्याचे दिसून आले. जेवणाची सोय  व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़. यासाठी प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे,  राजू मानकर व इतर कर्मचारी या नागरिकांसाठी परिश्रम घेत आहेत. या मजूर व कामगारांना कोरोना विषयी माहिती असल्यामुळे केंद्रातील  व्यक्तींची आरोग्य विभागाच्यावतीने नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी महापालिका अधिकारी स्वत: लक्ष ठेवून आहेत. 

असा आहे दिनक्रम
सकाळी सहा वाजता दिवसाची सुरवात होते. या  नागरिकांना दररोज सकाळी चहा, बिस्कीट, केळी, खिचडी, पोहे, तर दुपारी व सायंकाळच्या जेवण होते. काही जण सावलीचा आधार घेवून मोबाईलवर नातेवाईकांशी बोलत असल्याचे दिसून आले. तर काही जण मोबाईलवर गेम, क्रिकेट, फुटबॉल  खेळत वेळ घालवत असल्याचे पहावयास मिळाले. एकमेकांशी अनोळखी असलेले हे नागरिक आपापल्या भाषेतून अधूनमधून एक-दुसऱ्यांशी संवाद साधतानाही दिसून आले.

कर्नाटकचे संग्राम छापला यावेळी म्हणाले,  ‘घर की याद आती है,  नाश्ता, खाना समय पे मिलता है, कोई शिकायत नही, फिर भी घर में माताजी, पिताजी, बच्चे है, उनकी बहुत याद आती है, असे सांगत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com